Home

तटकरेंच्या होम ग्राऊंडवर शरद पवारांची तोफ




तटकरेंच्या होम ग्राऊंडवर शरद पवारांची तोफ


विजयासाठी आंबरसावत महाराजांना साकडे...


कोलाड आंबेवाडी नाक्यावर पवारांचे जल्लोषात स्वागत


रोहा प्रतिनिधी:

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणुक प्रचार जोरदार सुरू असतानाच इंडीया आघाडीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवारांची  महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या होम ग्राऊंडवर तोफ धडकली..नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत गीतेंच्या विजयासाठी कोलाड आंबेवाडी येथे श्री आंबरसावत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आल यावेळी रोहा तालुक्यातील शिवसेना,राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, आदी घटक पक्षातील तथा इंडीया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते...

रायगड लोकसभा निवडणुकीतून तटकरेना पराभूत करून तर अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मतांनी विजय होण्यासाठी आंबेवाडी येथील ग्राम दैवताला साकडे घातले.. आता भ्रष्ट कारभारी नेत्यांना घरी बसविण्याची वेळ आलेली आहे..

गीतेना निवडून आणण्यासाठी खुद्द जेष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले.. तर तटकरेंच्या पराभवासाठी पवारांची तोफ रायगडात आणि विषेतः म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात रोहा कोलाड आंबेवाडी नाक्यावर धडकली.. 

यावेळी इंडीया आघाडीचे नेते शरदचंद्र पवार, इंडिया आघाडीचे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार गीते यांच्या प्रचार्थ यावेळी शेकाप नेते आ. जयंता पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, विष्णूभाई पाटील, शंकरराव म्हसकर.समीर शेडगे,मनोहर महाबले,  दीपक तेंडुलकर, राजेश सानप,मारूती लोखंडे,  शांताराम महाडिक,गणेश शिंदे, चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत,शिवराम महाबले, मारूती सुरेश खैरे, खांडेकर,विठ्ठलराव मोरे,राजेश काफरे, आदित्य कोंडळकर,अनिश शिंदे,बबलूशेठ सय्यद,गणेश मढवी,सुनील महाडीक, विष्णु लोखंडे, बिन्धास्त धनावडे समिर महाबले,कुलदीप सुतार, अरविंद भिलारे, संकेत सोस्टे, बिलाल मोरबी, एलियाज डबीर, जुल्फिका डबीर, मझर सिद्दीक,अमीर तेलंगे, नितीन वारांगे,निलेश वारंगे, चेतना लोखंडे, संज्योत पडवळ, कस्तुरी सुतार, ऐश्वर्या शिंदे,आदी मान्यवर तसेच इंडीया आघाडीचे रोहा तालुक्यातील शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस,आदी घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post Next Post