शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते तळेश्वर वाडी - वाघविरा येथील शिवमंदिराचे जिर्णोद्धार
अलिबाग (प्रतिनिधी)
तळेश्वर वाडी वाघवीरा येथील शिव मंदिर हे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा. राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून तळेश्वर वाडी वाघविरा येथिल शिवमंदिराचे जिर्णोद्धार करण्यात आले. त्याचे उद्घाटन शिवरात्रीच्या दिवशी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा. राजाभाई केणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उप सरपंचा रसिकाताई केणी, ग्रामपंचायत सदस्या जागृती पाटील, अर्चना पाटील, प्रमोद पाटील, हृदयनाथ पाटील प्रदीप केणी, नारायण पाटील, मेघनाथ पाटील, प्रदीप ठाकूर, गोकूल पाटील, सत्यवान पाटील, धनंजय पाटील, भास्कर पाटील विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
