आंबेपूर गणात पुरामुळे शेतकऱ्यांच्या बांधांना खांडी: पंचायत समिती सदस्य शैलेंद्र पाटील यांच्याकडून पाहणी
अलिबाग (सचिन पाटील)
आज कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अलिबाग तालुक्यातील आंबेपूर पंचायत समिती गणातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधांना खांडी गेल्या आहेत त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुचनेनुसार आंबेपूर पंचायत समिती सदस्य शैलेंद्र पाटील यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याला भेटून त्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करून भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले तसेच पोयनाड बाजार पेठेत पाणी घुसलय म्हणून व्यापारी राजू अग्रवाल यांचा फोन आल्यावर पोयनाड ग्राम पंचायत व आंबेपूर ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रशासक यांना कळवले व दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत आमचे सहकारी पाठवून पुराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. एवढा मुसळधार पाऊस पडून सर्वत्र पाणीच पाणी अशावेळी जनतेसाठी धावून आल्याबद्दल आंबेपूर पंचायत समिती सदस्य शैलेंद्र पाटील यांचे आंबेपूर पंचायत समिती गणातील शेतकरी व नागरीकांनी खूप कौतुक केले