आईचे कुंकू
आदिशक्तीच्या रूपात आई निर्मला पाहीन
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावील
इथं नाही खेळखंडोबा करा फक्त तोबा तोबा
अंधश्रद्धा ही सोडून सूर्य उद्याचा पाहीन
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावील
सात चक्राचे केले भेदन झाले कुंडलीचे उत्थान
प्रभू येशूच्या संगतीन महालक्ष्मी पाहीन
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावील
तुझे उपकार माझ्यावर दिले गणेश मिळवून
अबोधिताचा संचार झाला माझ्या रोमा रोमात
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावील
येडा पिंक ला मध्ये सुशुमना तीन भगिनी ह्या भेटल्या
आई निर्मल च्या नावाने गोष्टी आमच्या रंगल्या
ब्रह्मांडाच्या या पैलूचे आई सातवे अवतरण
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावीन
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावील
माझ्या आईच्या नावाने कुंकू कपाळी लावीन
रचना .. कवी किशोर वसंतराव इंगोले, कृष्णकुंज नगर
बिजवे आमराई वडगाव रोड प्लॉट नंबर 29 यवतमाळ
मोबाईल नंबर... 9689064572
