शिवसेनेत नवे पदाधिकारी नियुक्त
मुरुड (प्रतिनिधी) : शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री. राजाभाई केणी यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
बारशिव, ता. मुरुड येथील श्री. निलेश शांताराम घाटवळ यांची "शिवसेना मुरुड तालुका प्रमुख" पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आगारवांदा, ता. मुरुड येथील श्री. ऋषिकांत शांताराम डोंगरीकर यांची "शिवसेना जिल्हा निवडणूक संपर्क प्रमुख रायगड" या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
शिवसेना पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली असून, नव्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षविस्तारासाठी योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
