Home

न. ग. पाटील यांच्या नाटकाला स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार


न. ग. पाटील यांच्या नाटकाला स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार

अलिबाग (वार्ताहर)

श्री न.ग.पाटील , भाकरवड (देहेन ) ता. अलिबाग. यांच्या '  देव गेला दिगंतरा ' नाटकाला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा  २०२५ कराड (सातारा ) येथे १ जुलै २०२५ रोजी स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्काराने  गौरवण्यात आले आहे .

या पूर्वी याच नाटकाला ' धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन फलटण येथे दिनांक  २७ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

   तसेच    त्यांच्या ' आगरी कोळी संस्कृती '  या कादंबरीस ११ एप्रिल २०२५ रोजी थिम्पू (भूतान)  येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय  आगरी अस्मिता साहित्य संमेलनात ' म. ना. पाटील वाड्मय पुरस्काराने '  गौरविण्यात आले आहे.

Previous Post Next Post