Home

मुंबईत तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी मारली; शरीराचे झाले दोन तुकडे



मुंबईत तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी मारली; शरीराचे झाले दोन तुकडे 

मुंबई

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी  रात्री विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये एका तरुणीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केली. कन्नमवारनगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा प्रकार घडला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आहे. 

या तरुणीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे विक्रोळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हर्षदाने इमारतीच्या सर्वात उंच म्हणजे २२ व्या मजल्यावर जात उडी घेतली. इतक्या उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. आणि ती जागीच गतप्राण झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती. स्थानिकांनी तत्परतेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनाकरिता पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिकांची आणि तिच्या जवळच्या माणसांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी या तरुणीला कोणता मानसिक किंवा शारीरिक त्रास होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Previous Post Next Post