Home

भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग




भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग


,ठाणे(वार्ताहर)

 भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाउंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीच्या भीषण घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली आहेत. तसेच फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आल्याचेही चित्र आहे. 

दरम्यान, या आगीतील धूराचे लोळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरूनही पाहिले जात आहे. आगीच्या आसपास रहीवाशी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाहीये. तर आगीचे कारणही अजूनही अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अजूनही किती वेळ लागेल हे ही सांगता येत नाहीये. तर फर्निचर गोदामाच्या शेजारी कापडाचा मोठा गोदाम असून त्याला ही आग लागण्याची शक्यता बळावली आहे

Previous Post Next Post