देवघर येथे लोखंडी बेंचेस व डस्टबीन लोकार्पण सोहळा संपन्न
रायगड(प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याचा जिव्हाळा जपणा-या इंडिया झिंदाबाद (आय.झेड)फ्रेण्डस गृप रायगड चा 19 वा आठवणीचा हिंदोळा म्हसळे तालुक्यातील देवघर गावी अमृतेश्वर मंदिर येथे दि. 02 फेबृवारी रोजी संपन्न झाला. या आठवणीच्या हिंदोळ्या निमित्त नुकताच देवघर गावाला पाच लोखंडी बेंचेस व कचरा व्यवस्थापनासाठी दोन डस्टबीन मोफत देण्यात आल्या.
या लोकार्पण सोहळ्यात कर्णाच्या मैत्रीची आणि दायित्वाची परंपरा जतन करणारे मंडळ म्हणजे इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड असे गौर उद्गगार म्हसळे तालुक्याचे माजी सभापती रविंद्र लाड साहेब यांनी काढले. 1992 पासून कार्यरत असणारे इंडिया झिंदाबाद मंडळ दरवर्षी म्हसळे तालुक्यातील एका गावात लोकांची गरज विचारात घेऊन ग्राम सुधारणा करण्याचा प्रयत्न करते.
या वर्षी देवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शांताराम चोकेकर,विनायक गीजे,जितेंद्र गीजे, रमेश पोटले आदी ग्रामस्थांच्या मागणी नुसार पाच लोखंडी बेंचेस व दोन डस्टबीन देण्यात आल्या. नुकताच या वस्तूंचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या वेळेस रायगड जिल्हा दक्षिण विभाग शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.नंदुभाई शिर्के, माजी सभापती रवींद्र लाड, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चे अध्यक्ष श्री.रमेश थवई, श्री.नरेश विचारे, श्री. राकेश पाटील,शंकर काथारा, प्रकाश खडस,नरेश सावंत,हेमंत माळी ,श्री.संदेश गावंड आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळेस श्री.दिलिप शिंदे आणि राज कावणकर यांनी आपल्या सुस्वर आवाजात आणि वाद्यवृंदांच्या
गजरात उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रमेश पोटले यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या पूर्व भागात शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप च्या सभासदांनी सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री.संवादकर गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली रानवडे या आदर्श गावाला भेट देऊन येथील ग्रामदैवत श्री.गणरायचे भेट घेतली.
या वेळेस आदर्श गाव रानवडे या गावाची रचना, स्वच्छता, गावकीचे नियम, एक गाव एकच गावकीचे दुकान, आय एस ओ मानांकन असणारी आदर्श शाळा, गावाचा पूर्व इतिहास या बाबत माहिती देताना संवाद गुरूजी म्हणाले की गावाची जर एकी असेल तर गावात शिस्त आणि संस्कार निर्माण होतात.आणि हीच शिस्त आणि संस्कार समाजाला दिशा देणारी एक आदर्श तत्व प्रणाली तयार होते.आज आपल्या देशाला अशाच आदर्श तत्व प्रणालीची गरज आहे.असे मत त्यांनी मांडले. या आदर्श गाव भेटीत श्री.संजय पाटील, रवी पाटील, सुबोध पाटील,डाॅक्टर कुंजवी म्हात्रे,सुबोध पाटील, खैरे गुरूजी,रमण पंडीत,नरेश सावंत, महेंद्र पाटील,मच्छिंद्र म्हात्रे, आदी सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या उत्तर भागात चांदोरे येथे हार्मोनियम वादक श्री.दिलिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गीत गायनाची मैफिल संपन्न झाली.या गीत गायनात रमण पंडीत, प्रकाश खडस, रमेश थवई,राकेश पाटील, महेंद्र पाटील,धामणकर सर,नाईक सर आदि मंडळीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवनावर आधारित मराठमोळी गीते सादर करून कार्यक्रमास रंगत आणली.
स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

