Home

खोपोली पत्रकार क्रिकेट संघा मार्फत अनोख्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.. पत्रकार तय्यब खान , आकाश जाधव यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक


 खोपोली पत्रकार क्रिकेट संघा मार्फत अनोख्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.. पत्रकार तय्यब खान , आकाश जाधव यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक..


खोपोली ( परमेश्वर कट्टमनी)

 रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली येथील पटांगणात पत्रकार तय्यबभाई खान आणि पत्रकार आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील खोपोली पत्रकार क्रिकेट संघामार्फत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.. आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये के.टी.एस.पी मंडळ शिक्षक , खालापूर वकील असोसिएशन , खोपोली पोलिस ठाणे , खोपोली नगरपरिषद कर्मचारी , खोपोली व खालापूर पत्रकार मित्र यांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला असून प्रथम क्रमांक एचएससी मंडळ शिक्षक तर द्वितीय क्रमांक खोपोली पत्रकार यानी पटकाविला. पत्रकार तय्यबभाई खान आणि पत्रकार आकाश जाधव यांच्या अनोख्या संकल्पनेचे उपस्थित सर्व टीम आणि आलेल्या सर्व मान्यवरांनी  कौतुक केले.. यावेळी माजी उपनगराध्य कुलदीपक शेंडे , खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे यशवंतशेठ साबळे , नामवंत उद्योजक दिपकशेठ कडव , जनता विद्यालय खोपोलीचे अध्यक्ष कैलासभाऊ गायकवाड , माजी नगरसेवक विशाल गायकवाड , नरेश जाधव , समीर मसुरकर , शुवसेना युवा नेते दिनेश थोरवे , वंचित बहुजन आघाडीचे दीपक गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते मोहन शिंदे , बाळाशेठ थोरवे , नितीन चौधरी , काँग्रेसचे सागर जाधव , संदेश धावारे , NDTV चे पत्रकार महेबुब जमादार , व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष फिरोज पिंजारी , खालील सुर्वे , खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे , भाई ओव्हाळ यांसह खोपोली खालापूर मधील सर्व पत्रकार मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आयोजक रायगड संकल्प न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार तय्यबभाई खान व पत्रकार आकाश जाधव यांना शुभेच्या देत कौतुक केले..


Previous Post Next Post