अलिबाग कडे पर्यटकांचा वाढता कल रायगड जिल्हा वाहतुक पोलीस यांचे काम कौस्तुकापद.
अलिबाग. (सचिन पाटील)
सतत आलेल्या सुट्या मुळे अलिबाग, मुरूड कडे पर्यटकांचा प्रचंड कल आहे. हजारोंच्या संख्येने वाहने वडखळ बाजूने अलिबाग कडे आली आहेत. मात्र वाहतुकीची कोंडी टाळण्यासठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे स्वतः रस्त्यावर उतरून त्यांच्या समवेत वाहतुक पोलीस तसेच होमगार्ड यांनी देखील कंबर कसली आहे. त्यामुळे यावेळी फारसी वाहतूक कोंडी झालेली दिसून येत नाही. पोयनाड ,पेझारी येथे कोंडी झाल्यास देहेन श्रीगाव मार्गे पेझारी असा पर्यायी मार्ग देखील पोयनाड पोलिस ठाणे तसेच वाहतूक विभाग यांनी केलेला ट्रफिक सुरळीत पणे चालू राहण्यासाठी अश्या प्रकारे उपाय योजना केल्या आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते देखील पोलिसांना सहकार्य करित आहेत. वाहतूक विभागाचे विशेष कौतुक होत आहे.
(छाया:दर्शन म्हात्रे)
