Home

सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; पत्नीनेच दिली हत्येची सुपारी



सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; पत्नीनेच दिली हत्येची सुपारी

पुणे(वार्ताहर)

 पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सतीश वाघ हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडला आहे. सतीश वाघ यांची पत्नीच हत्येचा मुख्य सूत्रधार निघाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उलगडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या मास्टरमाईंड सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ पहाटे साडे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण केले. नंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली. अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाणकरून व गळा दाबून खून करण्यात आला. 

थेट गाडी शिंदवणे घाटात नेली. नंतर तेथे एकाठिकाणी मृतदेह टाकून पुन्हा परत गाडी आली. 

दरम्यान या खून प्रकरणात खून पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती. त्यामध्ये वाघ यांच्या घराजवळच राहणाऱ्या एका आरोपीचाही समावेश आहे. सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्नही झाले होते. याप्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी केली आणि त्यानंतर तीदेखील या गटात सहभागी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. 

Previous Post Next Post