गोकुळ गायकवाड यांना राज्यस्तरीय
साहित्य स्पंदन ॲवाॅर्ड २०२४ प्रदान
अलिबाग (प्रतिनिधी)
शनिवार दि.२१/१२/२०२४ रोजी कराड जिल्हा सातारा येथील जयसिंग करपे धर्मशाळा हाॅल मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर ता जामखेड येथील कार्यरत आदर्श शिक्षक साहित्यिक गोकुळ श्रीरंग गायकवाड यांना त्यांच्या 'ताटातूट ' या उत्कृष्ट कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे स्पंदन साहित्य ॲवाॅर्ड २०२४ देऊन श्री.गुरु ष.ब्र.प्र.१०८ राष्ट्रसंत पद्मभास्कर डॉ नीळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते व मा.मंगेशजी चिवटे माजी कक्षप्रमुख मुख्यमंत्री साहाय्यता निधी,मा सौ.संगिता साळुंखे (माई) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या रा काॅ.शरदचंद्र पवार महिला आघाडी, मा. विठ्ठल डाकवे सुप्रसिद्ध मालिका दिग्दर्शक, आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ संदिप ठाकवे , ज्येष्ठ साहित्यिक सत्यवान मंडलिक यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, ग्रंथ , गौरवशाल देऊन सन्मानित करण्यात आले.
गोकुळ गायकवाड यांच्या 'धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा', वैचारिक 'माझा गाव माझी माणसं ' चरित्र 'वेदना 'कवितासंग्रा ह्या ग्रंथास सुमारे पंधरा राज्यस्तरीय व एक राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार मिळाले आहे.
गोकुळ गायकवाड यांचे जामखेड तालुक्यातील शिक्षक बांधवांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून अभिनंदन केले आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)