Home

गुरूवर्य बाळाराम पाटील विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न


 

*गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न..


नवी मुंबई (प्रतिनिधी)


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय दारावे,नेरुळ, नवी मुंबई येथे शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध पैलूंचा विकास व्हावा, त्यांच्यातील सुप्त कला गुण ओळखून योग्य ती दिशा त्यांना मिळावी, विद्यार्थी-शिक्षक व पालक यांचा योग्य समन्वय या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. यात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम, इकोक्लब उपक्रम व शालेय पोषण आहार अंतर्गत तिथी भोजन दिवस या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अखेरच्या दिवशी समुदाय सहभाग घेऊन समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला. सर्वच उपक्रमांत विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य योगदान मिळाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सर्वच उपक्रमांत सहभाग घेऊन आपली गुणवत्ता कौशल्य यांचे सादरीकरण केले. याप्रसंगी क्रीडा दिवसाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुनील पाटील साहेब यांच्या हस्ते करून क्रीडा शपथ घेण्यात आली. तसेच अध्यक्षांनी व्यायाम, खेळ व खेळांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच #plantformother या उपक्रमांतर्गत माता पालकांनी आपल्या पाल्यांच्या समवेत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.

याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश पवार सर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता ठुबे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपक्रमाअंतर्गत मिष्टान्न भोजन देण्यात आले. विद्यालयाच्या या उपक्रमांचे कौतुक सर्व पालक वर्गात होत असून या शिक्षण सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षण सप्ताह उपक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Previous Post Next Post