Home

थांब जरा अंगणी ‌...कवयित्री आश्विनी म्हात्रे


 

थांब जरा अंगणी


थांब जरा अंगणी

येई शितल वारा

नभाईत सूर दाटला

अंतरी नाचे मोरपिसारा...


शब्द शब्दांचे थवे

कसे पाखरू व्हावे

शुभ्र वस्त्र नेसून ते

शोभून ही दिसावे!


शुभ्र धुक्याची चादर

झाडा फुलांनी पांघरली

कण मोजित धुक्याचे

प्रभाराणी हासत आली!


थांब जरा अंगणी

दे निरोप सागराला

क्षितिजावरी उमटले

शिल्प मोती आठवाचे!

*©® आश्विनी सोपान म्हात्रे, उल्हासनगर*

म्हात्रे महाविद्यालय ग्रंथपाल बदलापूर


Previous Post Next Post