महायुतीचे उमेदवार यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही - अदिती तटकरे
अलिबाग - अमुलकुमार जैन
आगामी लोकसभा २०२४चे भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना (शिंदे गट), आणि मित्र पक्ष असे मिळून असलेली महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यानी चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित भाजप पदाधिकारी मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर पेणचे आमदार रविंद्र पाटील, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मापरा, भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप, अलिबाग विधासभा संघटक दिलीप भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, हेमंत दांडेकर सरचिटणीस गीता पारलेचा , ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे, आदी पदधिकारी उपस्थित होते.
यावेळी अदिती तटकरे यानी मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करीत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्रातून ४५पेक्षा अधिक खासदार निवडून येणे गरजेचे आहे.
मोदी यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एक संघाने काम करणार आपलं उद्दिष्ट यंदाच्या वेळेला देशांमध्ये मोदी यांनी आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी सगळ्यांसमोरच मांडलेला आहे की यंदाच्या वेळेला ४०५ उद्दिष्ट त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला असताना आपल्या राज्यामध्ये साधारणपणे ४८लोकसभेचे मतदार संघ आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून त्यानिमित्ताने निर्धार केलेला आहे की देशामध्ये ४०९ पार होत असताना इथेही आपल्याला ४५ पेक्षा अधिक खासदार त्या निमित्ताने महायुतीचे निवडून आणायचे आणि म्हणून हे उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला ३२रायगड लोकसभा मतदारसंघातून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार,व देवेंद्र फडणवीस आणि तिन्ही पक्षसहित मित्र पक्षाचे पदाधिकारी लोकसभेच्या तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. रवींद्र चव्हाण हे रायगडचे पालकमंत्री असताना मी रायगड जिल्हा परिषदची अध्यक्ष म्हणून कार्यरत होती. रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मला काम पाण्याची संधी मिळाली रवींद्रचा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ते पालकमंत्री असताना सुद्धा विकास कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तसं पाहायला गेलं तर कधी पक्षपात केला नाही. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सुनील तटकरे असतील मी असेल किंवा अनिकेत बाई त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यानिमित्ताने निश्चितपणे आहोत त्यामुळे आपण दिलेल्या ज्या काही सूचना आहेत याची तपशील त्याच त्याच दिवशी माहिती ही आपल्या खासदार म्हणजे उमेदवार सुनील तटकरे यांना सुद्धा त्यानिमित्ताने आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्ही सुद्धा या निमित्ताने हमी देते की ज्या सूचना आपण दिल्या आहेत त्या सूचनेच पालन करण्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
यावेळी सतीश धारप यांनी जो पहिल्यांदा त्याच्या कर्तृत्वाने या देशाला संपूर्ण जगात एक क्रमांकावर घेऊन जातोय त्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावे सत्ता पाहिजे आपण काय बरोबर गेले तरी चालतात पण त्यांना आणण्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान त्यामुळे १४० कोटी ज्या एका माणसाने आपलं सगळं आयुष्य देशाकरता पूर्णपणे वाहून दिलेला आहे अशा येतात त्याही माणसाला पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून जबाबदारी देण्याकरता आपण सगळा प्रकार ठेवून की मीच तो कार्यकर्ता आहे की जो आत्मविश्वासाने जनतेतील बत्तीस रायगडला कमळाचाच खासदार होय पण शेवटी काय असतं जर आपल्याला दिल्लीला जायचंय तर आपल्याला राजधानी पकडावे लागेल. २०१९ला जेव्हा उद्धवजींच्या शिवसेनेने आपल्या बरोबर काही ठिकाणी दगा फटका करून आपल्या जागा पाढल्या त्यामुळे आपण एकशे सहा वरती थांबलो होतो . आपण२०१४मध्ये १२२जागा आल्या स्वबळावर आपलं सरकार स्थापन होऊ शकलं असत तेव्हा सुद्धा केलेला होता तर देवेंद्रजींच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी आपल्याला न विचारता घोषणा केली की भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचां बाहेरून पाठिंबा दिला होता.शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी लढली पण त्याला आणखीन एक पोषक वातावरण काय निर्माण झालं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पण आपसात भांडण झाली मग आपल्याला जेव्हा सभागृहामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ वानखेडेवर झाल्यानंतर विश्वास दर्शक ठराव मांडला गेला तेव्हा शिवसेनेने विरोध करून सुद्धा आवाजी मतदानाने याच सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दिलेल्या पाठिंबामुळे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते देवेंद्रजी २०१४ ते २०१९ व्या काळात आपल्या सगळ्यांचं यशस्वी पणाने मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदललेली भूमिका शिवसेनेची बदललेली भूमिका आणि २०१९मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने आपला केलेला विश्वासघात आणि त्याला शरद पवारांनी दिलेली साथ या गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसले .महेश मोहिते यानी अदिती तटकरे यांना पुस्तक भेट दिलं भाजपाची वाटचाल ही बदललेली भारतीय जनता पार्टी आहे तर आपण त्याला सोडणार नाही असाच हिशोब पाहिजे. शिवसेना कुठली त्यांचं त्याला खायला अडीच वर्षांनी त्यांना कळलं की जेव्हा मत मागायला जनतेत जाऊ किंवा जनता क्षमा करणार नाही कारण ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला आहे ज्या काँग्रेसने अटलजींच्या नावाने शिव्या दिल्या आहेत ज्या काँग्रेसने ३७० ला विरोध केला आहे ज्या काँग्रेसची सीएएला विरोध केला आहे कायम मुस्लिम दृष्टीकरण आणि मार्ग स्वीकारले या काँग्रेस बरोबर आपण मंत्रिमंडळात आहोत लोकांना आपल्याला तोंड देणं शक्य होणार नाही.
यावेळी आमदार रवींद्र पाटील, राजेश मापारा, महेश मोहिते, परशूराम म्हात्रे, गीता पालेरचा , गिरीश तुळपुळे,उदय काठे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी आभार प्रदर्शन दिलीप भोईर यांनी केले
भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यात पक्षाचे उमेदवार म्हणून धैर्यशील पाटील हेच असतील असे सांगत त्यांना खासदार करण्यासाठी भाजप कार्यकर्ते यांनी कामाला लागले पाहिजे असे आदेश वेळोवेळी देण्यात येत होतें. मात्र आयत्यावेळी युतीचे उमेदवार म्हणून तटकरे यांना समोर आणले आणि आणि आता आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्ह याचे बटन दाबण्यास सांगतात हे कितपर्यंत योग्य आहे. असा अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी यावेळी उपस्थित केला.
------------------
