लकी ड्रॉ हिरकणी पैठणीच्या विजेत्या वसईच्या सौ प्रांजली प्रविण काळबेंडे
वसई(प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित २ रे राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन!
जागतिक महिला दिनानिमित्त सुनियोजित संपन्न झालेल्या कार्यक्रमात ६० हून अधिक साहित्यिक उपस्थित होते.सर्व सहभागी साहित्यिक यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह (ट्राॅफी) दिली गेली.
महिलांसाठी हळदकुंकूचा कार्यक्रम आखला होता,पदाधिकारी आणि ईतर मित्र/मैत्रीणी(वर्षा फटकाळे,सुनिता महाजन,सरोज गाजरे,रेखा मालपूरे,सीमाताई झुंजारवार,शोभाताई गायकवाड,दिपा व्रणकुद्रे,गीतांजली वाणी,राधिका बापट,शोभा अवसरे,सुवर्णा पवार, अश्विनी म्हात्रे......)यांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या, अतिशय आनंद वाटला.
या संमेलनात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवली होती. बालकांनी त्यांच्या कविताही सादर केल्या. सूत्रसंचालन खुपचं चांगले झाले.
विशेष म्हणजे या संमेलनात एक लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये मला अतिशय सुरेख पैठणी हि बक्षीस म्हणून मिळाली.
राजश्री बोहरा मॅडम, निरज बोहरा सर,लाडक्या अनिता ताई गुजर तसेच सर्वच आयोजक मंडळाचे भरभरून अभिनंदन करते,यांचे आभार मानते.
पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना मन प्रसन्न झाले.
पुढील कार्यक्रमाची ओढ लागली आहे.
अशीच अतिशय दर्जेदार, यशस्वी साहित्यिक सेवेची वाटचाल अविरतपणे चालू राहावी हीच अभामसाप साठी मनोमन सदिच्छा व्यक्त करते असे प्रांजलि काळबेंडे या व्यक्त झाल्या
