Home

व.पु.काळे जयंती निमित्त व.पु.काळे कन्या,लेखिका कवयित्री स्वाती काळे चांदोरकर यांनी उलगडले व.पुंचे व्यक्तिमत्व


 

व.पु.काळे जयंती निमित्त व.पु काळे कन्या ,लेखिका कवयित्री  स्वाती काळे चांदोरकर ह्यांनी उलगडले वपुंचे व्यक्तिमत्व 

मुंबई (प्रतिनिधी)


   मराठी भाषा संवर्धन,वाचन संस्कृतीस चालना देणे आणि सकारात्मक ,सृजन समाज निर्माण करण्यास हातभार लावणे अश्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या साहित्यसंपदातर्फे विविध साहित्य आणि सामाजिक क्षेत्राशी निगडित उपक्रम,संमेलने,कार्यशाळा आयोजित केले जातात.

   व पु काळे ह्यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे 'वपूर्वाई' या व पु काळे ह्यांच्या कथावाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.येणाऱ्या तरुण पिढ्यांमध्ये व.पु काळे ह्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा.त्यांचे साहित्य,विचार तर पिढीपर्यंत पोहचावेत म्हणून सदर उपक्रम संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या संकल्पनेतून पार पडला.

महाराष्ट्रातील विविध भागातील,स्तरांतील व.पु प्रेमींचा भरघोस प्रतिसाद सदर उपक्रमास लाभला.६०पेक्षा अधिक व.पु काळे ह्यांच्या कथांचे वाचन पार पडले.

कार्याध्यक्ष म्हणून मयूर पालकर ह्यांनी उत्तम भूमिका बजावली.

    कार्यक्रमाची सांगता लेखिका कवयित्री ,व.पु कन्या स्वाती काळे चांदोरकर ह्यांच्या मार्गदर्शनाने झाली.नव लेखकांनी लिहताना कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे,कश्या पद्धतीने आपले लिखाण वाचकांच्या पसंदीस पडू शकेल आणि इतर बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.संवेदनशील विषयांवर लिहणे समाजाची गरज आहे असं सांगताना त्यांच्या ऊस कामगारांवरील आधारित तोड,तृतीय पंथावरील आधारित हिजडे आणि इतर पुस्तकांचा आढाव सुद्धा उपस्थितांना घेता आला.

  सदर प्रसंगी व.पु.प्रेमींना त्यांच्याशी मुक्त संवाद साधता आला.व.पु काळे यांची जीवनशैली,त्यांचे विचार,जीवनातील काही प्रसंग श्रोत्यांना ऐकता आले.प्रश्न उत्तरे या स्वरूपात रंगलेल्या खुमासदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नेरकर ह्यांनी केले.

स्वाती काळे चांदोरकर ह्यांनी साहित्यसंपदाच्या उपक्रमांचे कौतुक करून त्यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Previous Post Next Post