Home

प्रीत तुझी गीत माझे.....कवयित्री शरयु पाम्पट्टीवार


 




*प्रीत तुझी गीत माझे


प्रीत तुझी गीत माझे

निघे सप्तसूर सारे

सहवासामध्ये तुझ्या

वाहे  प्रेमभरे  वारे...१


शब्द तुझे सूर माझे

धरे ताल लय गाणे

हर्षभऱ्या मिठीमध्ये 

मन  छेडीते  तराणे...२


श्र्वास तुझा जीव माझा

वेडावले  माझे मन

तुझ्या भासात सदैव

स्तब्ध हे चंचल तन...३


हात तुझा हाती माझ्या

देई जगण्यास बळ

तुझ्या स्पर्शात वाहते

मंद प्रेम दरवळ...४


रंग तुझा गंध माझा

मोहवितो सदोदित

जोडी तुझी माझी सख्या

राहो सदा अखंडीत ...५


सौ.शरयु पाम्पट्टीवार.

दिग्रस, यवतमाळ.


Previous Post Next Post