Home

मेटगुताड येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण संपन्न


 मेटगुताड येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण संपन्न

हिसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लि. विवो पुणे, उर्मी सामाजिक संस्थेचा महत्त्वपूर्ण उपक्रम.


          महाबळेश्वर (वार्ताहर)       

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम कोसळधार अतिवृष्टीच्या दऱ्या, खोऱ्या, मुऱ्या, वाडी, वस्ती, अन् गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या 113 शाळांमधील तब्बल 2486 विद्यार्थ्यांना हिसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, विवो मोबाईल कंपनी, पुणे, आणि उर्मी सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेटगुताड येथील सभागृहात विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण हिसोवा कंपनीची टीम उपस्थित होती. त्यामध्ये प्रामुख्याने सौम्य बक्षी (HRM), शिवकांत चव्हाण (FM), संदेश पिलके (MD) महाबळेश्वरचे जावई आणि सातारा सिटी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भोर, शिरवळ, पाचवड येथील (AM), गणेश कदम (MD) वाई अप कंट्री एरिया, किरण जावळे (SM) महाबळेश्वर एरिया, रोहित वाकळे (ASM) तथा CSR प्रमुख, स्वप्निल पडवळ (ASM) उपस्थित होते. त्यांच्यासोबत विवो कंपनीचे रिटेलर्स अभिजीत राजमाने गॅलेक्सी मोबाईल्स वाई, महेंद्र कदम सिद्धिविनायक मोबाईल्स महाबळेश्वर, निलेश मोरे महालक्ष्मी मोबाईल्स महाबळेश्वर उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कंपनी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर यांच्यामध्ये दुवा साधणारे उर्मी सामाजिक संस्थेचे समन्वयक राहुल शेंडे उपस्थित होते. या सामाजिक कार्यक्रमासाठी शैक्षणिक क्षेत्रातील आनंद पळसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर, सुरेंद्र भिलारे शिक्षण विस्तार अधिकारी बीट तापोळा, दगडू ढेबे केंद्रप्रमुख मेटगुताड, सुहास कुलकर्णी काका वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती महाबळेश्वर, जयराज जाधव उपक्रमशील शिक्षक, सुनील बावळेकर शिक्षणप्रेमी मेटगुताड, अनिल बावळेकर अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती मेटगुताड उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात महाबळेश्वर तालुक्यातील सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शिकण्याबद्दलची तळमळ, शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, विशेष उल्लेखनीय बाबी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा चढता आलेख, शिक्षकांचे विद्यार्थी घडवण्याप्रतीचे प्रयत्न याबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले.  कंपनीच्यावतीने मनोगत व्यक्त करताना शिवकांत चव्हाण यांनी 2017 पासून सुरू असलेला मदतीचा ओघ ग्रामीण भागातील शाळांशी, विद्यार्थ्यांशी असलेला सहसंबंध सांगितला. संदेश पिलके यांनी येथून पुढे देखील महाबळेश्वर तालुक्यातील सर्वच शाळांना आवश्यक असणारी शैक्षणिक आणि सामाजिक मदत करण्याचे आश्वासन दिले. रोहित वाकळे यांनी CSR उपक्रमाची यशस्विता आणि सामाजिक बांधिलकी याबाबत असलेली कंपनीची भूमिका स्पष्ट केली. उर्मी समन्वयक राहुल शेंडे यांनी समाजातील दुर्गम आणि दुर्लक्षित असलेल्या शाळांपर्यंत अधिकाधिक पोहोचून तेथील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर होण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्व विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सदरचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा मेटगुताडचे वरिष्ठ मुख्याध्यापक ज्ञानदेव शेलार, पदवीधर शिक्षक शंकर पवार, उपशिक्षक श्रीगणेश शेंडे, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक रमेश सरक यांनी केले. सर्व उपस्थितांचे स्वागत ज्ञानदेव शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन दगडू ढेबे यांनी केले.

Previous Post Next Post