Home

सुगरणीचे घरटे... कवयित्री प्रिया गावडे

 सुगरणीचे घरटे


शोधें खोप्यासाठी काड्या,

बारीक पण चिवट, 

विणें चोचीने, नरच,

करें मादीला आकृष्ट!...॥१॥


निंब, बाभळी, फांद्यांना,

लटकतें इमारत,

आत ऊबेसाठी, मऊ,

पिसे, कापूस, गवत!...॥२॥


असे, वर निमुळते,

लटकें, फांदी धरुन,

वार्‍यासवे हलें झूला,

बांधे, पिल्लांस स्मरुन!...॥३॥


गोलाकार मधोमध,

चंबू जणू, खोलगट,

मार्ग, चिंचोळा खालून,

करें ये जा झटपट!...॥४॥


चौरस सुबक वीण,

देईं मजबूती अशी,

सुगरणीचे घरटे,

सुरक्षित गुहा जशी!...॥५॥


अंडी घालून, उबवें,

पिल्ले वाढताना पाहें,

वीणकाम, कौशल्याला,

मानवाची दाद राहें!...॥६॥


सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Previous Post Next Post