महाराष्ट्र शासनाच्या वसतिगृह व निवासी शाळेत प्रवेश घ्यावा. -- डॉ. जयपाल पाटील. अलिबाग:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा तर्फे अनुसूचित जाती व जमातींच्या व नव बौद्ध विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेण्यासाठी रायगडचे सहाय्यक आयुक्त श्री. सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण,ज्येष्ठ पत्रकार, डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात इयत्ता 6 वी ते 10वीपर्यंत. अनुसूचित जाती व जमाती आणि नव बौद्ध मुलांनी करिता निवासी शाळा जावळी तालुका माणगाव येथे 200 मुलांची मान्यता असून, आतापर्यंत 70 मुलांनी प्रवेश घेतला आहे. येथे 130 रिकाम्या जागा आहेत. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह महाड येथे 100 मुलांची मान्यता असून70 मुलांचे प्रवेश झाले आहेत. येथे 30 जागा रिकाम्या आहेत. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह तळा येथे100 मुलांची मान्यता असून येथे 12 मुलांनी प्रवेश घेतला असून 88 जागा रिकाम्या आहेत. मुलांचे वसतिगृह अलिबागची मान्यता संख्या 75 असून येथे 14 मुलांचा प्रवेश झाला. आहे. 61 जागा रिकामी आहेत. मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मुलींचे अलिबाग येथील वसतिगृहाची मान्यता 80 असून येथे 15 मुलींचा प्रवेश झाला आहे. 65 जागा रिकाम्या आहेत. पनवेल येथील मुलींचे वसतिगृहाची मान्यता 62 मुलींचे प्रवेश झाले,असल्याने 13 जागा रिकाम्या आहेत. मुलींचे वसतिगृह महाड येथे मान्यता 75 ची असून 8जणींचा प्रवेश झाला आहे, तेथे 15 जागा रिकाम्या आहेत. मुलींचे वसतिगृह पाली येथे मान्यता 75 ची असून 7 मुलींनी प्रवेश घेतला आहे. 68 जागा शिल्लक आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका मोठे व्हा या सूचनेनुसार महाराष्ट्र शासन करीत असलेल्या या योजनेद्वारे आपल्या भागातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन राज्यातील समाजसेवकांना डॉ. जयपाल पाटील यांनी केले असून वसतिगृहात प्रवेशासाठी रायगड वसतीगृह प्रमुख श्री.संदीप कदम, मो.+919822035173 क्रमांक यांच्याशी संपर्क साधा,आणी अधिक माहितीसाठी श्री. सुनील जाधव सहाय्यक आयुक्त कल्याण रायगड, मो. क्र+919607110100 वर संपर्क साधावा.