लाडकी बहीण
मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण
जेव्हा फॉर्म भरायला येते
म्हणे पैसे नकोत दादा मला
पण मी तुलाच मत देते
जास्त काही नको दादा
महागाई थोडी कर कमी
तुला पुन्हा निवडून देण्याची
आम्ही बहिणी घेतो हमी
तुझ्या भाचा भाचीला
मोफत मिळूदे शिक्षण
नोकरीसाठी कोणाला
भटकावे लागू नये वणवण
नवऱ्याच्या पगारात दादा
खरच आहे रे मी खुश
कर्ज बळीराजाच माफ कर
जर पडला नाही पाऊस
या बहिणींसाठी दादा
एक अशी योजना काढ
वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला
जागच्या जागी गाड
समाजात वाढतोय व्याभीचार
तू कठोर कर शासन
प्रत्येक बहिणीला न्याय
मिळण्याचे देशील का रे वचन
अब्रूवर हात टाकणाऱ्याची
छाटून टाक मान
तेव्हाच तर होईल खरा
बहिणींच्या स्त्रीत्वाचा सन्मान
तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान.......
शब्दसंगिनी -सौ. वैशाली कैलास साळुंखे
(रोहा , रायगड)
